नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन बीमा निगम (LIC) ची आज बोर्ड बैठक होणार आहे. बोर्ड बैठकीत IDBI बँकेतील ५१ टक्के भागीदारीच्या अधिग्रहणाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. या अगोदर मागील महिन्यात हैद्राबाद येथे इंश्योरेंस रेग्युलेटर IRDAI बोर्ड बैठकीत आईडीबीआय बँकेत एलआयसीची भागीदारीचा प्रस्ताव ठेव्यात येऊन त्यास मंजुरी देण्यात आली होती.
IRDAI च्या मंजूरीनंतर LIC बँकेच्या ५१ टक्के भागीदारी असणार आहे. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बँकेला १० हजार ते १३ हजार कोटीचे पाठबळ मिळणार आहे.