दिल्लीतील सर्वात जुन्या बाजारातील एक असलेले गफार मार्केट हे इलेक्ट्रोनिक वस्तूंचे सर्वात मोठे मार्केट असून येथे स्मार्टफोन, टीव्ही सारख्या वस्तू अगदी स्वस्तात मिळतात. मोबाईल फोन चे सर्व सुटे भाग येथे मिळतातच पण फोन दुरुस्तीही करून दिली जाते. अर्थात हे सेकण्डहँड मार्केट असून येथे कोणत्याच वस्तूच्या खरेदीची पावती मिळत नाही तसेच त्याची गॅरंटी दिली जात नाही. तुम्हाला बार्गेनिंगची कला अवगत असेल तर या बाजारात तुम्ही स्वस्तात वस्तू मिळवू शकता.
येथे आयफोन १ हजारात मिळतो तर अन्य स्मार्टफोन ५०० रुपयांत मिळू शकतात. मोबाईलचे बाहेरच्या बाजारात १०० रु. ना मिळणारे कव्हर येथे १० ते २० रु. मिळते तसेच टेम्पर ग्लास सारखे सुटे भाग अगदी कमी किमतीत मिळतात. प्ले स्टेशन, गेम्स, टीव्ही सारख्या वस्तूही परवडणाऱ्या किमतीत हमखास मिळतात.
या मार्केटला ग्रे मार्केट म्हणूनही ओळखले जाते. १९५२ पासून सुरु असलेल्या या बाजारात कस्टमचा सर्व माल मिळतो तसेच क्रिस्टलच्या अनेक सुंदर सुंदर वस्तू येथे उपलब्ध आहेत.
https://maharashtrabulletin.com/exchange-offers-for-jio-phone/