Skip to content Skip to footer

कपिल देवला ३६ वर्षानंतर मिळाला प्रॉव्हीडन्ट फंड

टीम इंडियाचा माजी कप्तान आणि १९८३ मध्ये भारताला प्रथमच क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणारा खेळाडू कपिल देव याला अनपेक्षित धक्का बसला आहे. त्याला ३६ वर्षापूर्वीच मिळायला हवी होती ती भविष्य निर्वाह निधीची रक्कम नुकतीच मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कपिल देव १९७९ ते १९८२ या काळात मोदी स्पिनिंग विव्हिंग मिल मध्ये लायसनिंग ऑफिसर म्हणून नोकरी करत होता. त्याचे मुख्य काम तरुण क्रिकेटपटूना प्रोत्साहन देणे हे होते. १९९४ ला हि मिल बंद पडली पण कंपनी सुरु राहिली. गतवर्षी कंपनीची जुनी रेकॉर्ड चेक करत असताना कपिल देव याच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम त्यांना दिली गेली नसल्याचे मिलचे कंपनी सेक्रेटरी राजेंद्र शर्मा यांच्या लक्षात आले. त्यांनी त्वरित कपिल देव यांना आवश्यक कागदपत्रे पूर्ण करून देण्याची विनंती केली.

कपिल याला हा आश्चर्याचा धक्काच होता. मात्र त्यांनी त्वरीत सर्व औपचारिकता पूर्ण केली आणि त्यांच्या बँक खात्यात २ लाख ७५ हजाराची रक्कम जमा करण्यात आली.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5