मुंबई – गेल्या आठवड्यातील पाच सत्रांत सुरू असलेली घोडदौड कायम राखत आज शेअर बाजार च्या दोन्ही निर्देशांकांनी नवा उच्चांक प्रस्थापित केला. मुंबई शेअर बाजार चा निर्देशांक सेन्सेक्स १५७.५५ अंशांच्या वाढीसह ३७,४९४.४० अंशांवर बंद झाला. तर, राष्ट्रीय बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४१.२० अंशांच्या वाढीसह ११,३१९.५५ अंशांवर स्थिरावला.परकी निधीद्वारे निरंतर सुरू असणारा भांडवलाचा ओघ, गुंतवणूकदारांनी केलेली खरेदी दोन्ही निर्देशांकांना आज पुन्हा नव्या शिखरावर घेऊन गेली. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका, तेल आणि वायू, पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांत तेजी दिसून आली. एसबीआय, ओएनजीसी, आयसीआयसीआय बॅंक, कोल इंडिया, टाटा स्टील, एचयूएल, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल आदी शेअर वधारून बंद झाले.