Skip to content Skip to footer

खनिज तेलाच्या भावात घसरण

सिंगापूर – जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी घसरण झाली. खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल ७१.६० डॉलरवर आला. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आगामी काळात तेलाचे भाव भडकण्याचा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे.

चीनमधील औद्योगिक उत्पन्नाचे आकडे निराशाजनक असून, तुर्कस्तानमुळे कमोडिटीजच्या भावांना फटका बसला आहे. विकसनशील अर्थव्यवस्थांबाबत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या वाढीचा वेग कमी झाला आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची चिन्हे आहेत. या परिस्थितीत खनिज तेलाला मागणी कमी राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तेलाच्या भावात आज घसरण झाली. तेलाच्या भावात घसरण सुरू असली तरी आगामी काळात ते वाढण्याची शक्‍यता विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत.

अमेरिकेने निर्बंध लादल्याने इराणकडून होणारा तेलपुरवठा नोव्हेंबरपासून कमी होईल. इराणचे तेल उत्पादन जुलैमध्ये दररोज ३६.५ लाख बॅरल होते. तेल निर्यातदार देशांमध्ये आघाडीच्या देशांमध्ये सौदी अरेबिया आणि इराकनंतर इराणचा तिसरा क्रमांक आहे. यामुळे इराणकडून तेलपुरवठा कमी झाल्यास जागतिक पातळीवर तेलाचे भाव भडकू शकतात.

 

Leave a comment

0.0/5