Skip to content Skip to footer

सनी लिओनी म्हणतेय ‘निशाने माझं आयुष्यच बदलून टाकलं’

मुंबई : सनी लिओनीच्या आयुष्यात एक नवीन कोणीतरी आलं आहे. निशा असं तिचं नाव आहे. निशाच्या रुपाने आपलं एक स्वप्न सत्यात उतरलं असून, तिने आपलं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलंय असं सनीने अभिमानाने सांगते. निशा म्हणजे सनी लिओनी ची मुलगी! होय, या चिमुकलीने सनी लिओनीच्या घरातलं वातावरण पूर्णपणे बदलून टाकलंय.

हे आमचं भाग्य आहे, असं सनी सांगते.

सनी आणि तिचा पती डॅनियल यांनी नुकतेच एका मुलीला दत्तक घेतले आहे. याबद्दल सांगताना सनी म्हणते, मला या गोष्टीचा अविश्वसनीय आनंद होतोय. ती जगातील सर्वांत सुंदर छोटी मुलगी आहे. ती नेहमी खूश आणि स्मितहास्य करत असते. आमच्याबद्दल खूप प्रेम दाखवत असते. तिचे पालक होण्यासाठी तिने आमची निवड केली हे आमचं भाग्य आहे, असं सनी सांगते.

https://maharashtrabulletin.com/songs-marathi-sunnyleone/

माझा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला आहे. माझे विचार करण्याचे विषय बदलले आहेत. एक मिनिटही माझा दिवस चांगला जात नसेल तर मी निशाकडे पाहते. ती मला मोठी स्माईल देते आणि सगळं जे काही गैर आहे ते अदृश्य होते. ती आमच्या आयुष्यातील प्रकाश आहे, अशा भावना सनी लिओनीने व्यक्त केल्या.

via अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5