Skip to content Skip to footer

सुशांत-अंकिताचा ‘पवित्र रिश्ता’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे या दोघांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोघांच्या अभिनयाने लोकप्रिय झालेली ‘पवित्र रिश्ता’ ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेचं सिक्वेल वगैरे येणार नसून, मालिका झी टीव्हीवर रि-टेलिकास्ट केले जाणार आहे.

प्रेक्षकांच्या खास आग्रहास्तव ‘पवित्र रिश्ता’ मालिकेचं पुन्हा प्रक्षेपण करण्याचा निर्णय झी टीव्हीने घेतला आहे. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी चार वाजता झी टीव्हीवर ही मालिका दाखवली जाईल.

सुशात सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांची उत्कृष्ट केमेस्ट्री या मालिकेतून दिसली होती. या मालिकेच्या दरम्यानच सुशांत आणि अंकिता यांच्यात प्रेमाचं नातं जुळलं होतं. मात्र, नंतर मतभेदांमुळे दोघेही वेगळे झाले. सुशांत सिनेमांमध्ये व्यस्त झाला, अंकिता मात्र कुठेच दिसली नाही.

विशेष म्हणजे, सुशांत आणि अंकिता यांनी त्यांच्या ब्रेकअपबाबत कुठेच बातचित केली नव्हती. मौन बाळगण्यातच त्यांनी धन्यता मानली. मात्र आता आपण त्यातून सावरलो असल्याचे अंकिताने सांगितले आहे.

दरम्यान, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली ‘पवित्र रिश्ता’ मालिका पुन्हा भेटीला येत असल्याने, अर्थात मालिकेचे रसिक आणि सुशांत-अंकिताचे चाहतेही आनंदात असल्याचे दिसून येते आहे. आता पुन:प्रक्षेपणाला किती प्रतिसाद मिळतो, हे मालिका प्रत्यक्षात टीव्हीवर झळकण्यास सुरुवात झाल्यावरच कळेल.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5