भारताला वेड लावणा-या, काही क्षणांसाठी सगळी दु:ख विसरून खळखळून हसवणारा कपिलचा शो म्हणजे, प्रेक्षकांसाठी पर्वणीच. नव्या टीजरमध्येही हेच दाखवण्यात आले आहे.
टीव्हीवरचा स्टार कॉमेडियन कपिल शर्मा परततोय आणि बातमी अगदी पक्कीआहे. होय, प्रेक्षकांना पोट धरून हसवणा-या कपिलच्या नव्या को-या ‘द कपिल शर्मा शो‘ चा पहिला वहिला टिझर प्रदर्शित झालाय. अख्ख्या भारताला वेड लावणा-या, काही क्षणांसाठी सगळी दु:ख विसरून खळखळून हसवणारा कपिलचा शो म्हणजे, प्रेक्षकांसाठी पर्वणीच. नव्या टीजरमध्येही हेच दाखवण्यात आले आहे. अर्थात कपिलचा शो कधीपासून येणार, याचा खुलासा मात्र टीजरमध्ये करण्यात आलेला नाही.
Poore India ko ek saath hasaane aa raha hai #TheKapilSharmaShow! Jald hi sirf Sony par. @KapilSharmaK9 pic.twitter.com/nDvw0Zl5W0
— sonytv (@SonyTV) November 27, 2018