Skip to content Skip to footer

दूध की दही, जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे फायदेशीर ?

अयोग्यासाठी तसेच शरीराची योग्य वाढ होण्यासाठी कॅल्शियमची आवश्यकता असते. कॅल्शियमुळे हाडं व दात मजबूत होतात. याशिवाय कॅल्शियममुळे हाय ब्ल़ड प्रेशर, हाय कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. यामुळे रोजच्या जेवणात अशा कॅल्शियमयुक्त पदार्थांचा वापर करणे गरजेचे असते. दूध,दही व दुग्धजन्य पदार्थात कॅल्शियम असल्याने या पदार्थांचा आहारात समावेश करावा. पण बऱ्याचवेळा दूध घ्यावे की दही असा प्रश्न सगळ्यांना पडतो. यापैकी कोणता पदार्थ घेतल्याने अधिक फायदा होईल याबदद्ल जाणून घेऊ या.

साधारणत: दह्याच्या तुलनेत सर्वप्रकारच्या दूधात सगळ्यात जास्त कॅल्शियम असते. 100 ग्रॅम दूधात 125 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. तर 100 दह्यातून फक्त 85 मिलिग्रॅम कॅल्शियम असते. पण या दोघांचे सेवन केल्याने शरीराला फायदा मात्र नक्कीच होतो. त्यातही जर कॅलरीजबदद्ल विचाराल तर 250 मिलिलीटर फॅट फ्री दूधात जवळजवळ 90 कॅलरीज आणि 9 ग्रॅम प्रोटीन असतं. तर एक कप फॅट फ्री दह्यात 98 कॅलरीज आणि 11 ग्रॅम प्रोटीन असते. यावरून दूधाच्या तुलनेत दह्यात जास्त कॅलरीज आणि प्रोटीन असतात. यामुळे दूधापेक्षा दही शरीराला अधिक फायदेशीर आहे.

दूध आणि दह्यामध्ये व्हिटामिन बी 12 आणि व्हिटामिन ए असतं. एक कप फॅट फ्री दही व दूध या दोघांमध्ये जवळजवळ 8 टक्के व्हिटामिन बी 12 आणि 2 टक्के प्रमाण व्हिटामिन ए असते. तसेच १८ वर्षाहून अधिक वय असलेल्या व्यक्तींना दिवसाला कमीत कमी 2.4 मायक्रोग्रॅम व्हिटामिन बी 12 आणि 1.3 मिलिग्रॅम व्हिटामिन ए घेण्याचा सल्ला दिला जातो. दूध व दह्यात व्हिटामिनचे प्रमाण भरपूर असल्याने या दोन्ही पदार्थांचे सेवन करणे उपयुक्त आहे. त्यातही दूधापेक्षा दही खाणे तब्येतीसाठी जास्त फायदेशीर आहे.

पण सामान्य दही खाण्यापेक्षा फॅट फ्री दही खाणे जास्त फायदेशीर आहे. कारण यात कॅलरीजचे प्रमाण कमी असते. पण व्हिटामिन मात्र भरपूर असते. जर तुम्हाला तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर रोजच्या जेवणात 250 मिलीलीटर फॅट फ्री दह्याचे सेवन करा. पण ज्यांना बद्धकोष्ठ, दमा, सांधेदुखी व शरीराला सूज येण्याची तक्रार असेल त्यांनी दही न खाल्लेलंच बरं.

Leave a comment

0.0/5