Skip to content Skip to footer

अमिताभ बच्चन करताहेत नागराज मंजुळेच्या ‘ह्या’ सिनेमात काम

बॉलिवूडचा सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ‘सैराट’ फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे एकत्र चित्रपट करणार असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून रंगली होती.
या चर्चेला अखेर अमिताभ बच्चन यांनी पूर्णविराम दिला आहे. त्यांनी ट्विटरवर नागराज मंजुळेचा आगामी चित्रपट ‘झुंड’मध्ये काम करत असल्याचे सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘नागराज मंजुळेच्या चित्रपटात काम करत असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरूवात करू.’ इतकेच नाही तर त्यांनी नागराज मंजुळे आणि सुधाकर रेड्डी यंकट्टी यांच्या नाळ सिनेमाचा ट्रेलरसुद्धा शेअर केला आहे.

Leave a comment

0.0/5