Skip to content Skip to footer

नेहा कक्कर लग्नापूर्वी प्रेग्नंट? फोटो केला शेअर

आपल्या सुरेल आवाजाने सर्वांना मग्नधुंद करून टाकणाऱ्या गायिका नेहा कक्कर हिचे काही दिवसांपूर्वी लग्न झाले होते. रायझिंग स्टार फेम रोहनप्रीत सिंग बरोबर तिने आपल्या लग्नाची गाठ बांधली होती. त्यामुळे काही दिवसांपासून नेहा आणि रोहन प्रीत यांची सोशल मीडियावर जास्त चर्चा होताना दिसून येत होती.

आता पुन्हा एकदा नेहा कक्कर आणि रोहनप्रिंत यांची चर्चा होताना दिसत आहे. कारण विषयच जरा हटके आहे. नेहा लवकरच आई होणार असून तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चाहत्यांमध्ये जास्त चर्चा होत आहे. विशेष म्हणजे नेहाचा हा फोटो पाहून ती लग्नापूर्वीच प्रेग्नंट असल्याचे बोलले जात आहे.

सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेल्या नेहाने अलिकडेच तिचा आणि रोहनप्रीतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये नेहाचं बेबीबंप दिसत असून ती प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. विशेष म्हणजे अनेक सेलिब्रिटींनीदेखील तिला आणि रोहनप्रीतला शुभेच्छा दिल्या आहेत. हाने फोटो शेअर करत “खयाल रखा कर”, असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या फोटोवर रोहनप्रीतनेदेखील कमेंट केली आहे. “आता तर आणखी जास्त काळजी घ्यावी लागेल”, अशी कमेंट रोहनप्रीतने केली आहे.

Leave a comment

0.0/5