पोषणतज्ज्ञ सिमरन खोसला यांनी इंस्टाग्रामवर पौष्टिक असलेले काही पदार्थ शेअर केली आहेत. जी तुम्हाला उपवसाच्या दिवसात उत्साही ठेवतील. तसेच नैसर्गिकरीत्या तुमचे इन्सुलिनचे प्रमाण कमी करण्यास मदत करतील.
नवरात्रीच्या या उत्सवाला अखेर सुरुवात झाली. या नवरात्रीच्या सणात नऊ दिवसात अनेक लोकं उपवास करतात.अशातच अनेकांना उपवसाचे हेल्दि आणि निरोगी आहार तसेच दिवसभर तुम्हाला उत्साही ठेवण्यासाठी काही पर्याय शोधत असतात. यावेळी पोषणतज्ज्ञ सिमरन खोसला यांनी काही उपवासाची पदार्थ सांगितली आहे. जाणून घेऊयात.
साबुदाणा उपवासाच्या दिवसात साबुदाणा खिचडी प्रत्येकाच्या घरी सगळ्यात फेमस पदार्थ असतो . साबुदाणा हा पचण्यास हलका असून यातील कार्बोहायड्रेट्स शरीरातील चयापचय पातळी संतुलित करते आणि ग्लूकोजच्या स्वरूपात शरीरात ऊर्जा निर्माण करतात.
दुध उत्पादने दुग्धजन्य पदार्थ आपण एखाद्या शुभ प्रसंगी आहारात समावेश करतो. तसेच उपवासाच्या दरम्यान तुम्ही दूध, दही, पनीर, लोणी, तूप, खवा आणि कंडेन्स्ड मिल्क या पदार्थांचा आहारात वापर करू शकता.घरी उपवासाचे पदार्था बनवताना अनेकदा विचारात पडतो की नेमकी कोणते मसाले पदार्थांमध्ये टाकू शकतो. तर यावेळी तुम्ही काळी मिरी पावडर, हिरवी वेलची, लवंगा, दालचिनी, अजवेन, कोकम, चिंच आणि जायफळ वापरू शकता.
मखाना (फॉक्सनट) हे एक अतिशय लोकप्रिय उपवासात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. हे अँटिऑक्सिडंट्सने भरलेले आहे आणि याच्या सेवनाने पांढरे केस, सुरकुत्या आणि अकाली वृद्धत्व रोखून वृद्धत्वविरोधी तुमच्या शरीरात कार्य करते.
फळे आणि भाज्याबटाटा, भोपळा, केळी, अरबी, यम, रताळे, लिंबू, मध, काकडी, कच्ची केळी, टोमॅटो, गाजर, पपई, आणि पालक हे पदार्थ नवरात्रीच्या दरम्यान सामान्यतः खाल्ल्या जातात.
कुट्टू आटा उच्च फायबरने भरलेले असते. जे तुमच्या शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतात. अधिक फायबर असल्याने उपवासाच्या दरम्यान तुम्ही कुट्टू अट्ट्याचे पदार्थ बनवून खाल्लात तर तुम्हाला जास्त भूक लागणारा नाही. तसेच तुमचं पोट भरलेले राहील. तसेच कुट्टू आटा ऐवजी तुम्ही राजगिर्याचे पीठ, सिंघड्याचे पीठ, देखील वापरू शकता.
सुका मेवा (ड्राय फ्रूट) बदाम, पिस्ता, काजू, आणि किश्मिश (मनुका) या सुका मेव्याचे उपवसाच्या दरम्यान तुम्ही आहारात समावेश करावा. कारण याने तुमच्या शरीरात ऊर्जा टिकून ठेण्यास मदत होते.