Skip to content Skip to footer

मंगळ ग्रहावर आढळले सरोवर ; जीवसृष्टी असण्याच्या शक्‍यतेला बळकटी 

टाम्पा (अमेरिका) : मंगळ ग्रहावर पृष्ठभागाखाली प्रथमच एक मोठे सरोवर असल्याचे आढळून आले असून, यामुळे तेथे जीवसृष्टीचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. इटलीच्या संशोधकांना हे सरोवर सापडले आहे. याबाबतचे संशोधन त्यांनी अमेरिकेतील एका विज्ञानविषयक जर्नलमध्ये प्रसिद्ध केले आहे.

मंगळावरील बर्फाच्या थराखाली हे सरोवर असून, त्याची लांबी जवळपास वीस किलोमीटर आहे. मंगळ ग्रहावर सापडलेला पाण्याचा हा सर्वांत मोठा साठा आहे. हे सरोवर बर्फाच्या थराखाली दीड किलोमीटर खोलीवर आहे. मंगळावर तात्पुरत्या कालावधीसाठी पाण्याचे प्रवाह होते, ही समजूत या नव्या शोधामुळे चुकीची ठरली असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मंगळावर कायमस्वरूपी पाण्याचा साठा असून, त्यामुळे जीवसृष्टीला पोषक वातावरणही असण्याची शक्‍यता आहे, असे संशोधकांचे म्हणणे आहे.

मंगळ हा थंड आणि कोरडा ग्रह असला, तरी कधी काळी त्यावरील वातावरण अधिक उष्ण होते. सुमारे 3.6 अब्ज वर्षांपूर्वी या ग्रहावर पाण्याचे प्रचंड साठे होते. त्यामुळे या ग्रहावर त्या पाण्याच्या साठ्याचा शोध घेण्याच्या निमित्ताने “मंगळावर जीवसृष्टी आहे का, अथवा होती का?,’ या प्रश्‍नाचा शोध घेण्याचा संशोधक अव्याहत प्रयत्न करीत आहेत. आजच्या या शोधामुळे मंगळ मोहिमेवर मानवाला पाठविण्याबाबतही सकारात्मक विचार केला जाण्याची दाट शक्‍यता आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5