गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर ‘किकी चॅलेंज’ व्हायरल होत आहे. चालत्या गाडीतून खाली उतरून किकी गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ अनेकजण सोशल मिडीयावर अपलोड करत आहेत. आतापर्यंत गाडीतून खाली उतरून अनेकांनी किकी चॅलेंज केले पण चालत्या विमानातून खाली उतरुन किकी चॅलेंज करणाऱ्या वैमानिक आणि तिच्या सहकाऱ्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
#kiki dance in pilots way 💃😅 pic.twitter.com/62zKlz58fx
— Aviationdaily✈️الطيران يوميآ (@Aviationdailyy) August 28, 2018
मुळची मेक्सिकोची असलेली वैमानिक अलजेंद्र मॅनीक्रेझ आणि तिच्या सहकाऱ्याचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओच्या सुरवातीला ती विमानाच्या कॉकपिटमध्ये बसलेली दिसते. त्यानंतर विमान सुरु करुन ती खाली उतरते आणि तिच्या सहकाऱ्यासोबत डान्स करते. हा व्हिडीओ ट्विटरवर शेर करण्यात आला असून आता पर्यंत 60 हजार पेक्षा जास्त लोकांनी तो पाहिला आहे.
चालत्या विमानातून खाली उतरून वैमानिकाने अशा प्रकारे व्हिडीओ बनविण्यावर काहींनी नाराजी व्यक्त केली आहे, तर काहींनी वैमानिकाचे कौतूक केले आहे.