Skip to content Skip to footer

‘जिओनी’ च्या चेअरमननी जुगारात गमावले 1008 कोटी, कंपनी दिवाळखोरीच्या मार्गावर

बीजिंगजुगाराच्या आहारी गेलेल्या माणसांची ‘ना घरका ना घाटका’ अशी गत होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जुगारात जिंकले तर दिवाळी, नाहीतर दिवाळे अशी भल्याभल्यांची अवस्था झाल्याची उदाहरणे आहेत. जुगाराच्या व्यसनापायी जिओनी स्मार्टफोन कंपनी दिवाळखोरीत जाणार असल्याचं वृत्त आहे. सध्या कंपनी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याची चर्चा आहे. कंपनीच्या या परिस्थितीला जुगारात 1008 कोटी रुपये (14.4 कोटी डॉलर) हरणारे चेअरमन लिऊ लिरॉन कारणीभूत असल्याची माहिती मिळाली आहे.

जुगाराच्या आहारी गेलेले जिओनीचे अध्यक्ष लिरॉन साइपेनमधील एका कॅसिनोमध्ये जुगार खेळायला गेले. परंतु, नशिबाचं चक्र उलटे फिरले आणि ते तब्बल 10 अब्ज युआन म्हणजेच हिंदुस्थानी रुपयाप्रमाणे 1008 कोटी रुपये हरले. याबाबतची माहिती चीनच्या एका संकेतस्थळाकडून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तर दुसरीकडे जिओनीचे अध्यक्ष लिरॉन यांनी आपण जुगारात 1 खर्व रुपये हरल्याचं मान्य केलं आहे, असा दावा अॅड्रोइड अॅथोरिटीनं केला आहे.

कंपनी दिवाळखोरीकडे
जिओनीनं आपल्या सप्लायर्सची बिले थकवली असून, सुमारे 20 सप्लायर्सनी शेनजेन न्यायालयात कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. तत्पूर्वी, हिंदुस्थानी बाजारपेठेत पाय रोवण्यासाठी जिओनीकडून हिंदुस्थानात 6.5 अब्ज रुपये गुंतवणूक होणार असल्याचं वृत्त यावर्षीच्या एप्रिल महिन्यात प्रसिद्ध झालं होतं. हिंदुस्थानी बाजारपेठेत पहिल्या पाच मोबाइल कंपन्यांत स्थान पटकावण्याचे उद्दिष्ट कंपनीकडून निश्चित करण्यात आलं होतं. त्याच महिन्यात जिओनीनं ‘जिओनी एफ 205’ आणि ‘जिओनी एस 11’ हे दोन स्मार्टफोन हिंदुस्थानात लॉन्च केले होते.

मी जुगार खेळण्यासाठी कंपनीच्या पैशांचा वापर केला नव्हता. पण आता गरज पडल्यास कंपनी फंडातून काही पैसे उसने घेऊ शकतो, असे जिओनी मोबाइलचे चेअरमन लिऊ लीरॉन म्हणाले.

Leave a comment

0.0/5