Skip to content Skip to footer

गुरू रंधावा यूट्युबवर सर्वाधिक पाहिला जाणारा गायक

नवी दिल्ली : टी-सीरिजचा गायक गुरू रंधावा याला यूट्युबवरील सर्व चॅनेल्सवर तीन बिलियनहून अधिक वेळा पाहिलं गेलं आहे. अशारितीने गायक-रॅपर हनी सिंग आणि बादशाह यांना मागे सोडत गुरू रंधावा यूट्युबवर सर्वाधिक वेळा पाहिला गेलेला गायक बनला आहे. चाहत्यांनी दिलेल्या या प्रेमाबद्दल गुरूने त्यांचे आभार मानले आहेत.

गुरुने ‘सूट सूट’, ‘हाय रेटेड गबरू’, ‘लाहोर’ आणि ‘बन जा तू मेरी राणी’ यासारखी गाणी गायली आहेत. गुरूने म्हटलं की, ‘मला दिलेल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल सर्व चाहत्यांचे आभार मानतो.  मला वाटतं भारतात पहिल्यांदा कोणत्या गायकाला यूट्युबवर तीन बिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. मला खूप आनंद होत आहे आणि जगभरातील चाहत्यांनी माझ्या गाण्यांना आवडीनं पाहिलं त्यांचे मी आभार मानतो.

गुरूच्या यशामध्ये टी-सीरिजचे चेअरमन भूषण कुमार यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यांनी गुरू रंधावा याला 2015 मध्ये प्रथम ‘पटोला’ गाण्यासाठी करारबद्ध केलं.

गुरुच्या यशानंतर भूषणकुमार म्हणाले की, “मला अभिमान आहे की, टी-सीरिज कंपनीचा कलाकारानं यशाचं उत्तुंग शिखर गाठलं आहे. गुरुच्या यशानंतर इंडिपेंडेंट म्युझिक आणि नव्या कलाकारांना संधी देण्यासाठी माझा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5