Skip to content Skip to footer

आठ दिवसात ३ शासकीय कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी.

मृत पावलेल्या अभियंत्यांमध्ये दत्ता शिंदे हे वयाने लहान होते

एका आठवडय़ात मुंबई महापालिकेतील तीन अभियंत्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. स्थापत्य विभागातील दुय्यम अभियंता दत्ता शिंदे, पाणी खात्यातील दुय्यम अभियंता विनोद भटकर आणि आर मध्य कार्यालयातील चंद्रकांत मुंडफन अशी या तिघांची नावे आहेत.

पालिकेच्या विविध विभागांतील सुमारे पाच हजारांहून अधिक कर्मचारी आतापर्यंत बाधित झाले असून त्यापैकी २०० कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक कामगार आहेत. त्यातच गेल्या आठवडय़ात तीन अभियंत्यांचा मृत्यू झाल्यामुळे पालिकेच्या अभियंत्यांना धक्का बसला आहे. मृत पावलेल्या अभियंत्यांमध्ये दत्ता शिंदे हे वयाने लहान होते. महापालिकेने एका प्रकरणात त्यांना पूर्वी निलंबित केले होते. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. ते नेस्को कोविड जंबो फॅसिलिटी येथे कर्तव्य बजावत होते. त्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न प्रलंबित होता. अनेकदा नगर अभियंता, चौकशी  विभाग, कायदा विभाग येथे वेळोवेळी पाठपुरावा करून पदोन्नती होत नसल्याने ते चिंताग्रस्त होते, अशी माहिती अभियंत्यांच्या संघटनेचे साईनाथ राजाध्यक्ष यांनी दिली. त्यातच शिंदे यांना कोविडची लागण झाली. सुरुवातीस नेस्को कोविड सेंटरमध्ये त्यांना दाखल केले, त्यानंतर सेवन हिल्स येथे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि रविवारी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती राजाध्यक्ष यांनी दिली.

मागणी काय?

पालिकेतील अभियंत्यांना या करोनाच्या काळात आपले स्वत:चे काम सोडून करोना जबाबदारीवर पाठवण्यात आले आहे. एप्रिलपासून या अभियंत्यांना कर्तव्यातून सूट दिलेली नाही. विमानतळावर आलेल्या रुग्णांच्या तपासण्या करण्याचे कामही अभियंत्यांना देण्यात आले असून

Leave a comment

0.0/5