Skip to content Skip to footer

राऊतांचा संताप ‘त्या’ बाईकवर तात्काळ कडक कारवाही करण्याची मागणी


राऊतांचा संताप ‘त्या’ बाईकवर तात्काळ कडक कारवाही करण्याची मागणी

कोरोनाच्या पाश्वभूमीवर संपूर्ण राज्यभरात पोलिसांवर हल्ले वाढलेले दिसून येत आहे. एकीकडं संसर्गात सुद्धा आपल्या जीवाची बाजी लावून आहोरात्र सेवा बजावताना पोलीस कर्मचारी दिसत असताना दुसरीकडे मात्र काही समाजकंठक पोलिसांवर हल्ले करून आपल्या संस्कृतीचे दर्शन जनतेला घडवून देत आहेत.

वाहतुकीचे नियम मोडल्याने कारवाई केलेल्या ट्राफिक पोलीस कर्मचाऱ्याला विनाकारण खोटे आरोप लावून एका महिलेने बेदम चोप दिला आहे. या पोलिस कर्मचाऱ्याने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा खोटा आरोप सदर महिला करत आहे. या प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त करत सदर महिलेवर कडक कारवाहीची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख, सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील काळबादेवी परिसरात ट्रॅफिक हवालदाराने एका महिलेने वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्या हवालदाराने आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा दावा त्या महिलेने केला आहे.
या व्हिडीओत महिला आणि तिच्या साथीदाराकडून वारंवार शिवीगाळ का केली? असा जाब विचारला आहे. त्यानंतर त्या महिलेने या व्हिडीओत हवालदाराची कॉलर पकडत मारहाण केली. तसेच त्या हवालदाराचे कपडेही फाडले. या व्हिडीओत ती महिला त्या हवालदाराला शिवीगाळ करताना दिसत आहे.

Leave a comment

0.0/5