Skip to content Skip to footer

रिपब्लिक चॅनेलच्या पाच गुंतवणूकदारांना समन्स

रिपब्लिक चॅनेलच्या पाच गुंतवणूकदारांना समन्स

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी (टेलिव्हीजन रेटींग पॉईंट) अर्थात टीआरपी घोटाळा उघडीस आणला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी अनेकांना ताब्यात घेतले होते. तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक धक्कदायक माहिती सुद्धा समोर आली होती.

पैशाचे आमिष दाखवून अनेक घरांमध्ये टीआरपी वाढवण्यासाठी TRP मशीन बसवून टीआरपी वाढविण्याच्या घोटाळ्यात गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने ‘रिपब्लिक चॅनेल’च्या पाच गुंतवणूकदारांना समन्स जारी केले आहे. त्यामुळे आर. रिपब्लिक आणि अर्णब गोस्वामी याच्या अडचणीत अधिक वाढ झालेली दिसून येत आहे.

या पाच गुंतवणूकदारांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येवू शकते. महत्त्वाचे म्हणजे यातील चार कंपन्यांचे मुख्य कार्यालय कोलकात्यात आहेत. या कंपन्यांच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत कोणते आहेत याची देखील चौकशी होणार आहे.

याप्रकरणी वाहिन्यांच्या आर्थिक व्यवहारांचे गुन्हे शाखेने फॉरेन्सिक ऑडिट सुरू केले आहे. आरपीजी पावर ट्रेडिंग, अनंत उद्योग एलएलपी, पूर्वांचल लिझिंग, पॅन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आणि डायनामिक स्टोरेज अँड रिट्रीव्हल सीस्टीम या कंपन्या रिपब्लिक वाहिनीत गुंतवणूकदार आहेत.

Leave a comment

0.0/5