पिंपरी : महानगर पालिकेने गेल्या चार महिन्यात विकास कामांसाठी वार्षिक भांडवल खर्चाच्या केवळ १५% रक्कम खर्च केली आहे.
महापालिकेच्या वार्षिक अर्थसंकल्पात भांडवली विकासकामांसाठी सुमारे ११४२ कोटी ७९ लाख रुपयांचा अंदाज मांडला आहे.त्यातील जुलै अखेर फक्त १७३ कोटी ४२ लाख रुपये खर्च झाले आहेत. यंदा महापालिका सार्वत्रिक निवडणुकांमुळे, महापौर, स्थायी समिती निवडणुकांमुळे, अर्थ संकल्प १५ जून ला मंजूर झाला.शहरातील अनेक कामे प्रलंबित आहेत त्याचमुळे शहराचा विकासाचा वेग मंदावला आहे.