Skip to content Skip to footer

शिवप्रताप प्रतिष्ठानच्या वतीने संजय भिसे यांना ‘उद्योगरत्न’ पुरस्कार प्रदान

पिंपरी :- पुणे येथील शिवप्रताप प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार यंदा पिंपळे सौदागर येथील उन्नति सोशल फाऊंडेशनचे संस्थापक श्री. संजय भिसे यांना देण्यात आला.
माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, तसेच अँड. अपर्णा रामतीर्थकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

समाजात विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्‍तींचाही सन्मान यावेळी करण्यात आला. यात हनुमंत गायकवाड, डॉ.रविंद्र पोमण, अभिनेता सुरेश विश्वकर्मा, सचिन सातव, अभिजीत धोत्रे, जन्मेजयराज भोसले, संग्राम चौघुले, सुनील भजनावळे, श्रीगौरी सावंत, विजय चौधरी व डॉ. हंसराज थोरात यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच पुणे येथील जनता वसाहत येथे कॅनल फुटल्याने वाहत्या पाण्यात अनेक महिला, ज्येष्ठ नागरिक, मुले अडकली होती. त्यापैकी एका मुलाचे प्राण वाचवणाऱ्या महिला पोलीस नीलम गायकवाड यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी उन्नति सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. कुंदाताई संजय भिसे, उदय परदेशी, गणेश परदेशी, केदार पाटील, पृथ्वीराज परदेशी, जयराज परदेशी, प्रदीप कांबळे, चंद्रशेखर कोरडे, गिरीश घोरपडे नंदकुमार बोके, संदीप पांढरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विजय बोत्रे पाटील यांनी सूत्रसंचालन तर मिलिंद परदेशी व आनंद परदेशी यांनी आभार मानले.

Leave a comment

0.0/5