Skip to content Skip to footer

प्रियांका चोप्रा घेऊन येतेय ‘Bumble’ डेटींग अ‍ॅप!!

बॉलिवूड ते हॉलिवूड आणि अ‍ॅक्टिंग ते प्रोड्यूसरपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता एक नवी इनिंग सुरू करतेय. होय, आता प्रियांका इन्व्हेस्टर अर्थात गुंतवणूकदार बनली आहे.

प्रियांकाने अलीकडे दोन टेक स्टार्सअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली. यातील पहिली कंपनी आहे सॅन फ्रांसिस्कोची टेक स्टार्टअप कंपनी होल्बर्टन कंपनी. ही एक कोडिंग एज्युकेशन कंपनी आहे. तर दुसऱ्या कंपनीचे नाव ‘बंबल’ आहे. ‘Bumble’ ही एक डेटींग अ‍ॅप असून या वर्षांच्या अखेरपर्यंत ‘बंबल’ भारतात पाय पसरण्याच्या तयारीत आहे. दुस-या शब्दात सांगायचे तर या कंपनीसोबत मिळून प्रियांका भारतात ‘बंबल’ ही डेटींग अ‍ॅप सुरू करणार आहे.

Leave a comment

0.0/5