Skip to content Skip to footer

वनाज- रामवाडी मेट्रोचे काम आजपासून 

पुणे – वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गावरील आठ स्थानकांच्या उभारणीसाठीच्या निविदांची मुदत महामेट्रोने दोन सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. तर, याच मार्गावरील मेट्रोच्या कामाचे कंत्राट एनसीसी लिमिटेड या कंपनीला मिळाले असून, सोमवारपासून (ता. 21) त्यांचे काम सुरू होणार आहे.

वनाज- रामवाडी मार्गावरील मेट्रोमार्गावर आठ स्थानके उभारण्यासाठी महामेट्रोने निविदा मागविल्या होत्या. त्याची मुदत 18 ऑगस्ट होती. परंतु, याबाबत निविदा भरणाऱ्या काही इच्छुक कंपन्यांनी शंका उपस्थित केल्या. त्याचे निरसन महामेट्रोने नुकतेच केले. त्यामुळे या निविदांची मुदत दोन सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दरम्यान, वनाज- रामवाडी मार्गावरील वनाज ते शिवाजीनगर न्यायालय दरम्यान मार्ग उभारणीचे सुमारे 475 कोटी रुपयांचे कंत्राट एनसीसी लिमिटेड या कंपनीला मिळाले आहे. याच कंपनीला पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यान मार्ग उभारणीचे कंत्राट मिळाले आहे. वनाज- रामवाडी मार्गावरील जिओ टेक्‍निकल सर्वेक्षणाचे काम महामेट्रोकडून सोमवारपासून सुरू होणार असून, त्यानंतर दहा दिवसांत मेट्रोमार्गाचे खांब उभारण्याचे काम सुरू होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

अवश्य वाचा -चांदणी चौकातील पुलाचे उद्या भूमीपूजन.

दरम्यान, मेट्रोमार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहनचालकांना सुरू असलेल्या कामाची कल्पना मिळावी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजनांची अंमलबजावणी होत आहे का, यावर देखरेख करण्यासाठी चार निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांचे पथक महामेट्रोने कार्यान्वित केले आहे.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5