Skip to content Skip to footer

द्रुतगती महामार्ग वर अपघात, मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प

रायगड : मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग वर खोपोली नजीक अपघात झाला आहे. कंटेनर ट्रेलर पलटी झाल्याने मुंबईकडे येणारी वाहतकू काही प्रमाणात ठप्प झाली आहे.

अपघातामुळे मुंबईकडे येणाऱ्या द्रुतगती महामार्ग वरील दोन लेन बंद करण्यात आल्या आहेत.

कंटनेर हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

https://maharashtrabulletin.com/ganpati-festival-pune-visarjan/

खोपोलीजवळ फुडमॉल परिसरात हा अपघात झाल्याची माहिती आहे.

तुम्हीही मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग वरुन प्रवास करत असाल, तर वाहतूक कोंडीची पूर्वकल्पना ठेवूनच प्रवास करा.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5