Skip to content Skip to footer

गुलाब निळ्या रंगाचा! – दि रोझ सोसायटी ऑफ पुणे

पुणे – तुम्ही लाल गुलाब पाहिला असेल, पिवळा गुलाब पाहिला असेल, वेगवेगळ्या ‘शेड’मधील गुलाबी रंगाचाही गुलाब पाहिला असणार; पण निळ्या रंगाचा गुलाब कधी पाहिला आहे का? नाही ना… मग तो पाहण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे ‘दि रोझ सोसायटी ऑफ पुणे’ यांनी.

पुणेकरांना यंदा प्रथमच निळ्या रंगाचा गुलाब ‘दि रोझ सोसायटी ऑफ पुणे’ या संस्थेच्या गुलाब प्रदर्शनात पाहायला मिळणार आहे.

https://maharashtrabulletin.com/iron-man-anjali-pune/

संस्थेचे यंदाचे शंभरावे प्रदर्शन असून ते १६ व १७ सप्टेंबर दरम्यान मुकुंदनगर येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आयोजिण्यात आले आहे. येथे लाल, पिवळा, गुलाबी अशा विविध रंगांतील गुलाब असणार आहेत.

यापैकी प्रमुख आकर्षण असणार आहे, ते निळ्या गुलाबाचे. पुण्यातील गुलाबप्रेमी गणेश शिर्के यांच्या प्रयत्नातून हा गुलाब विकसित झाला आहे.

संस्थेचे अध्यक्ष रवींद्र भिडे म्हणाले, ‘‘गुलाबामध्ये निळ्या रंगाचे जिन्स नाहीत. त्यामुळे निळ्या रंगाचा गुलाब पाहायला मिळत नाही.

त्यामुळे जपानमध्ये २००६ मध्ये निळ्या रंगाचा संकरित गुलाब विकसित झाला. तो प्रदर्शनातही ठेवला गेला होता; पण त्याची रोपे तयार करण्यात आली नाहीत.

असा गडद निळ्या रंगाचा गुलाब तयार व्हावा म्हणून शिर्के हे गेली काही वर्षे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यशही आले आहे. त्यामुळे हे फूल यंदाच्या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहे.

या शिवाय, एका फांदीला एकच फूल असलेले एचटी, एकच फांदीला फुलांचे गुच्छ असलेले फ्लोरीबंडा, छोट्या आकाराची असलेली मिनियेचर अशी नानाविध प्रकारची अडीच हजार फुले प्रदर्शनात पाहायला मिळतील.

प्रदर्शनाचे उद्‌घाटन सिटीआर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार यांच्या हस्ते होणार आहे.’’

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5