Skip to content Skip to footer

पंतप्रधानांच्या लाइव्ह भाषण ला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाइव्ह भाषण चे प्रसारण करण्यात आले. त्यास विद्यार्थ्यांनी उत्साहाने हजेरी लावली. अनेक महाविद्यालयांमध्ये या प्रसारणासाठी वेगळी व्यवस्था केली होती.

स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे दिलेल्या भाषणाला सव्वाशे वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विश्‍वबंधुत्व दिनानिमित्त मोदी यांनी ‘युवा भारत, नवा भारत’ या विषयावर विद्यार्थ्यांना उद्देशाशून भाषण दिले.

देशभरात त्याचे प्रसारण करण्यात आले. त्यासाठी विद्यापीठाने यापूर्वीच सर्व महाविद्यालयांना ‘लाइव्ह’ प्रसारण करण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार महाविद्यालयांनी त्यांच्या ऑडियो-व्हिडिओ सभागृह, व्हर्च्युअल क्‍लासरूममध्ये प्रसारण आयोजित केले. त्यास विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.

शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयात सुमारे तीनशे विद्यार्थी उपस्थित होते.

https://maharashtrabulletin.com/blue-rose-pune/

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात (पुम्बा) आणि रसायनशास्त्र विभागात हे प्रसारण झाले. दोन्ही ठिकाणी साडेचारशेहून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांशी याबाबत संवाद साधला असता, तरुणाई प्रेरणादायी आणि नव्या युगाचे भान देणारे, जबाबदारीची जाणीव करून देणारे हे भाषण होते, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

फर्ग्युसन महाविद्यालयात यापूर्वी मोदी आले होते. त्यांचे भाषणही या ठिकाणी झाले. त्यामुळे या महाविद्यालयाने त्यांचे ‘लाइव्ह’ भाषण दाखविण्यासाठी तयारी केली होती. सर परशुरामभाऊ महाविद्यालयात व्हर्च्युअल क्‍लासरूम सुरू करण्यात आले आहे. त्याची सुरवात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाने करण्यात आली. या महाविद्यालयात संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी भाषण ऐकले.

माहितीसाठी

Leave a comment

0.0/5