Skip to content Skip to footer

शारदा – गजाननाला वाढदिवसानिमित्त 125 किलोचा नैवेद्य 

पुणे – आकर्षक फुलांची आरास करून सजविलेले शारदा गजानन मंदिर….मंदिरात सकाळपासूनच भाविकांची रीघ…शारदा-गजाननाच्या मूर्तीला अर्पण केलेली भरजरी वस्त्रे अन्‌ फुलांचे हार आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर…

फेसबुक लाइव्हद्वारे पाहणारे असंख्य भाविक…या वातावरणात अखिल मंडई मंडळातर्फे गजाननाच्या मूर्तीचा 124 वा वाढदिवस गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

शारदा-Akhil-Mandai-Mandal-Pune

यानिमित्त शारदा -गजाननाच्या मूर्तीचे विलोभनीय रूप भाविक मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होते.

पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्या हस्ते 125 किलोचा केक कापण्यात आला.

मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कोशाध्यक्ष संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, नगरसेवक सम्राट थोरात, नगरसेविका गायत्री खडके, आनंद सराफ, देविदास बहिरट, विश्वास भोर, संजय यादव, विकी खन्ना, हरीश मोरे, सूरज थोरात, किशोर आदमणे उपस्थित होते.

न्यू गंधर्व बॅन्ड पथकाची सुमधूर सुरावट आणि नादब्रह्म वाद्य पथकातील वादकांचे जल्लोषी वादनाने उपस्थित गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले.

https://maharashtrabulletin.com/blue-rose-pune/

थोरात म्हणाले, “”मंडळाचे पुढच्या वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यंदापासूनच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु झाले असून, या निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजिण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5