Skip to content Skip to footer

iPhone 7, 7 Plus, 6, 6 Plus च्या किंमतीत कपात

मुंबई : अॅपलने iPhone 8, iPhone 8 प्लस आणि iPhone X च्या लाँचिंगनंतर iPhone 7 सह इतर फोन्सच्या किंमतींमध्ये मोठी कपात केली आहे.

आयफोन 7 सीरिजमध्ये आयफोन ने 7 हजार 200 रुपयांची कपात केली आहे.

जुन्या आयफोन्सपैकी आता iPhone 7 सीरिज, iPhone 6S आणि SE एवढेच फोन बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील.

मंगळवारी iPhone 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन लाँच करण्यात आले.

त्यानंतर कंपनीने आता वेबसाईटवर जुने फोन अपडेटेड किंमतीसह लिस्ट केले आहेत.

https://maharashtrabulletin.com/iphone-8-8-plus-x/

iPhone 7 आणि iPhone 7 प्लस

आयफोन 7 प्लसचं 256GB व्हेरिएंट कंपनीने भारतात विक्रीसाठी बंद केलं आहे. iPhone 7 च्या 32GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये,

आयफोन 7 प्लसच्या 32GB मॉडेलची किंमत 59 हजार रुपये करण्यात आली आहे.

आयफोन 7 च्या 128GB मॉडेलची किंमत 58 हजार रुपये आणि iPhone 7 प्लसच्या 128GB मॉडेलची किंमत 68 हजार रुपये आहे.

iPhone 6S

आयफोन 6S च्या 32GB मॉडेलची किंमत 40 हजार रुपये, तर iPhone 6S प्लसच्या 32GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये असेल.

iPhone 6S च्या 128GB मॉडेलची किंमत 49 हजार रुपये, तर iPhone 6S प्लसच्या 128GB मॉडेलची किंमत 58 हजार रुपये असेल.

iPhone SE

आयफोन SE च्या 32GB मॉडेलची किंमत 26 हजार रुपये, तर या फोनच्या 128GB मॉडेलची किंमत 35 हजार रुपये आहे.

Samsung Galaxy Note 8 या 8 कारणांमुळे खरेदी करु शकता…!

iPhone X

अॅपलच्या या सर्वात स्पेशल फोनची किंमत 1 लाखांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. भारतात या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 1 लाख 2 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.

या फोनची सुरुवात 89 हजार रुपयांपासून होईल. 3 नोव्हेंबरपासून हा फोन भारतात उपलब्ध होईल.

iPhone 8 आणि iPhone 8 Plus

29 सप्टेंबरला हे दोन्ही फोन भारतात लाँच होतील. iPhone 8 च्या 64GB मॉडेलची किंमत 64 हजार रुपये असेल. तर या फोनच्या 256GB मॉडेलची किंमत 77 हजार रुपये असेल.

Apple बेस मॉडेल यावेळी 64GB चं आहे. त्यामुळे या दोन्ही फोनच्या किंमतीची सुरुवात 64 हजार रुपयांपासून होईल.

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5