Skip to content Skip to footer

ह्या सेलिब्रिटीज अजूनही का आहेत ‘सिंगल’?

बॉलीवूड मधील सेलिब्रिटीज असोत किंवा छोट्या पडद्यावरील स्टार्स असोत, कोणाची जोडी कोणाबरोबर जमली, किंवा कोणाची जोडी तुटली हे जाणून घेण्यामध्ये दर्शकांना नेहमीच रस असतो.

सेलिब्रिटीज  देखील आजकाल सोशल मिडीयाच्या द्वारे आपल्या आयुष्यातील प्रेमाचे क्षण आपल्या चाह्त्यांसोबत शेअर करीत असतात.

पण ह्या स्टार्सच्या भाऊगर्दीमध्ये काही स्टार्स असेही आहेत जे अजूनही ‘सिंगल’ आहेत, आणि सिंगल असूनही आपल्या जीवनामध्ये अतिशय आनंदी आहेत.

कौटुंबिक टीव्ही मालिकांची क्वीन एकता कपूर सिंगल आहे, आणि तिला आपली जीवनशैली अतिशय प्रिय आहे. तिच्यामध्ये भारतामध्ये विवाहसंस्था आणि एकत्र कुटुंबपद्धती यांना खूप महत्व असले, तरी केवळ परंपरा म्हणून किंवा आयुष्यातील एकाकीपणा घालविण्यासाठी लग्न करणे एकताला पटत नाही.

https://maharashtrabulletin.com/condolence-message-social-media/

तिच्या मते, एकाकीपणा हा विवाहित लोकांच्या आयुष्यामध्ये देखील येऊ शकतो. शिवाय एका स्त्रीचे आयुष्य तिच्या जोडीदाराशिवाय परिपूर्ण होऊ शकत नाही, ही विचारसरणी देखील एकताला पटत नाही. तिच्या मते प्रत्येकाने आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगायला हवे, त्यासाठी कोणत्याही परंपरांना किंवा रूढींना बळी पडता कामा नये असे एकता म्हणते.


प्रसिद्ध अभिनेत्री आणि पूर्व मिस युनिव्हर्स असलेली सुश्मिता सेन ही देखील सिंगल आहे, आणि आपल्या आयुष्यामध्ये संपूर्णपणे समाधानी आहे. आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगण्यासाठी, सर्व सुखसुविधा मिळविण्यासाठी आपल्याला पतीची गरज नसल्याचे सुश्मिता म्हणते. सुश्मिताने वयाच्या पंचविसाव्या वर्षी तिच्या पहिल्या मुलीला दत्तक घेतले. काही काळापूर्वी सुश्मिताने तिच्या दुसऱ्या मुलीलाही दत्तक घेतले. केवळ लग्न केल्यानेच एक स्त्री समाधान आणि सुखी राहू शकते ही विचारसरणी आपल्याला पटत नसल्याचे सुश्मिता म्हणते.

सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री असलेली आणि सध्या आपल्या भूमिकांनी हॉलीवूडमध्ये देखील स्वतःची खास ओळख निर्माण करणारी प्रियांका चोप्रा, सध्या आपण लग्नाचा विचार मुळीच करीत नसल्याचे म्हणते. त्याचप्रमाणे अभिनेत्री नर्गिस फाखरी देखील आपण ‘करियर वूमन’ असण्याबद्दल समाधानी आहे. एका ठराविक वयाच्या मुली झाल्यानंतर त्यांच्या परिवारजनांना मुलींनी लवकर ‘सेटल’ व्हावे असे वाटत असते. पण ही विचारसरणी आता जुनाट झाली असून मुलींना आपले आयुष्य आपल्या मर्जीनुसार आणि आपल्या हिम्मतीवर जगता यायलाच हवे असे प्रियांका म्हणते.

Leave a comment

0.0/5