वजन घटवायचे आहे. मग याच वेळी करा भोजन

वजन-weight-loss-methods

आपण वजन घटविण्यासाठी भरपूर व्यायाम करीत असाल, खाण्या-पिण्यावरही आपण नियंत्रण ठेवले असेल, पण तरीही वजनाच्या काट्यावर उभे राहिल्यानंतर आपल्याला अपेक्षित परिणाम का बरे दिसत नाहीत?

आहारनियमांचे काटेकोर पालन करून देखील वजन घटत नाही याचे कारण आपण भोजन तर आहारनियमाप्रमाणे करतो, पण भोजन घेण्याच्या वेळेबाबत मात्र आपण तितकेसे काटेकोर नसतो. याच कारणाने भरपूर व्यायाम करून आणि डायट सांभाळून देखील मनाप्रमाणे वजन घटत नाही.

ज्याप्रमाणे योग्य आहार महत्वाचा आहे, त्याचप्रमाणे तो आहार घेण्याची वेळ पाळणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. वेळेवर भोजन घेतल्याने शरीरातील चरबी घटण्यास मदत होतेच, शिवाय वेळी अवेळी लागणारी भूक देखील नियंत्रणात ठेवता येते.

https://maharashtrabulletin.com/how-to-reduce-fat/

सकाळी उठल्यानंतर आपण नाश्ता, उठल्यानंतर तासाभराच्या आत घ्यायला हवा. सकाळचा ब्रेकफास्ट हे दिवसातील सर्वात मुख्य भोजन समजले जाते.

आदल्या रात्रीच्या भोजनानंतर सकाळी उठेपर्यंत आपण अन्नाचे सेवन करीत नाही, त्यामुळे हा ‘उपवास’ संपविणारे, ब्रेकफास्ट हे महत्वाचे भोजन असते. त्यामुळे उठल्याबरोबर एका तासाच्या आतमध्ये ब्रेकफास्ट घेणे आवश्यक आहे. वेळेवर नाश्ता घेतल्याने शरीरातील चयापचय वाढतो, आणि दिवसभर काम करण्याची स्फूर्ती शरीरामध्ये राहते.

ब्रेकफास्ट करायचे टाळणे, किंवा उशीरा ब्रेकफास्ट करणे या सवयीने वजन घटविणे कठीण होते.

सकाळचा नाश्ता आणि दुपारचे जेवण यामध्ये चार तासांचे अंतर असेल असे पाहावे. त्यामुळे आपण सकाळी नऊ वाजता नाश्ता घेत असल्यास दुपारी एक च्या सुमाराला आपण जेवण घ्यावे. जर दुपारच्या जेवणाला उशीर होत गेला, तर त्यामुळे शरीरातील ब्लड शुगर लेव्हल्स झपाट्याने कमी होऊ लागतात. अनेकदा कामाच्या व्यापात दुपारची जेवणाची वेळ टाळून जाते, आणि मग भूक लागली की समोर येतील ते स्नॅक्स भूक भागविण्यासाठी खाल्ले जातात. हे खाणेच वजन वाढविण्यास जबाबदार ठरते. त्यामुळे दुपारच्या जेवणाची वेळ पाळणे आवश्यक आहे.

रात्रीचे भोजन आपण झोपण्याच्या किमान तीन तास आधी घ्यावे. असे केल्याने आपण खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. झोपेमध्ये पचनक्रिया शिथिल होते. झोपेच्या आधी तीन तास भोजन घेतल्यानंतर काही ना काही कामांमुळे शरीराची हालचाल सुरु असते. त्यामुळे अन्न पचण्यास मदत होते. जर जेवण झाल्यानंतर लगेच झोपले, तर अन्नाचे पचन व्यवस्थित न होता, गॅसेस, अॅसिडीटी तर होतेच, पण त्याशिवाय ब्लड शुगर लेव्हल्समध्ये वाढ होत असल्याने शांत झोप देखील लागत नाही. त्यामुळे झोपण्याची वेळ आणि रात्रीच्या जेवणाची वेळ यामध्ये किमान तीन तासांचे अंतर असावे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here