Skip to content Skip to footer

सरकारी कार्यालयात झोपा काढत मनसेचं खड्ड्यांविरोधात अनोखं आंदोलन

पुणे : खड्ड्यांविरोधात अनोख्या आंदोलनांची मालिका मनसेने पुण्यातही सुरु ठेवली आहे. मनसेने खड्डयांविरोधात आणखी एक अनोखं आंदोलन पुण्याच्या मावळमध्ये केलं. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांनी थेट झोपा काढत आपला निषेध नोंदवला आहे.

मावळातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. या खड्ड्यांपासून मुक्तता मिळावी, यासाठी आज मनसे कार्यकर्ते बांधकाम विभाग कार्यलयात निवेदन देण्यासाठी गेले. मात्र एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित नव्हता. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी झोपा काढत आंदोलन सुरु केलं.

मनसे कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे कार्यालयात उपस्थित कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच धांदल उडाली. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच तातडीने त्यांनी कार्यालयात धाव घेतली.

अधिक माहितीसाठी

https://maharashtrabulletin.com/raj-thackeray-attack-on-state-government-on-neet-exam-issue/

Leave a comment

0.0/5