Skip to content Skip to footer

Bhosari: ‘दुचाकी हळू चालव’ असे सांगितल्याने तरूणाला मारहाण

एमपीसी न्यूज – दुचाकीला कट मारल्याने तरूणाने एकाला दुचाकी हळू चालव, असे सांगितले. यामुळे चिडलेल्याने आपल्या दोन साथीदारांना बोलावून घेत दुचाकीस्वाराला गव्हाणे तालीम येथे घेऊन जात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. हा प्रकार 3 फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा नऊ वाजता भोसरी येथे घडला.

याप्रकरणी स्वराज गव्हाणे, आदित्य आव्हाळे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आकाश हवालदार सिंग (वय 21, रा. सद्‌गुरू सदन, इंद्रायणीनगर, भोसरी) याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

 

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आकाश आणि त्याचा मित्र विरेंद्र पाटील 3 फेब्रुवारी रोजी धावडेवस्ती येथून दुचाकीवरून किराणामाल घेऊन घरी जात होते. यावेळी आरोपी स्वराजने फिर्यादीच्या दुचाकीला कट मारला. आकाश याने स्वराजला ‘दुचाकी हळू चालव’ असे सांगितले.

 

यावरून चिडलेल्या स्वराज याने आपल्या साथीदारांना बोलावून घेतले. आकाशला दुचाकीवरून बसवून गव्हाणे तालीम येथे घेऊन गेले आणि तिथे गेल्यावर लाकडी दांडक्याने डोक्यावर, बांबुने कानावर मारहाण करून गंभीर जखमी केले. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Leave a comment

0.0/5