पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर ठिकठिकाणी दुरुस्ती आणि स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या डागडुजीची कामे सुरु आहेत. या कामांना वेग मिळण्यासाठी पुणे-लोणावळा रेल्वेमार्गावर डिसेंबर महिन्यात दुपारच्या वेळी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे लोणावळा आणि लोणावळा पुणे मार्गावरील चार लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
# गाडी क्रमांक 99816 पुणे स्थानकावरून दुपारी 12.15 वाजता सुटणारी पुणे लोणावळा लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.
# गाडी क्रमांक 99818 पुणे स्थानकावरून दुपारी 01.00 वाजता सुटणारी पुणे लोणावळा लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.
# गाडी क्रमांक 99813 लोणावळा स्थानकावरून दुपारी 02.00 वाजता सुटणारी लोणावळा-पुणे लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.
# गाडी क्रमांक 99815 लोणावळा स्थानकावरून दुपारी 02.50 वाजता सुटणारी लोणावळा-पुणे लोकल गाडी रद्द करण्यात आली आहे.