Skip to content Skip to footer

अनिल कपूर ला व्हायचंय एक दिवसाचा पंतप्रधान

पणजी : जर मला संधी मिळाली तर एक दिवसाचा पंतप्रधानही होईन असं म्हणत पंतप्रधान होऊ अशी इच्छा अभिनेता अनिल कपूर यांनी बोलून दाखवली आहे. ‘इफ्फी’ मध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी ही इच्छा व्यक्त केली. अनिल कपूर यांचा ‘नायक’ हा २००१ साली प्रदर्शित झालेला चित्रपट बॉक्स ऑफीसवर सुपरहिट ठरला होता हे सर्वांना माहीत आहेच. यामध्ये अनिल कपूर यांनी पत्रकाराची भूमिका साकारली होती, ज्याला एक दिवसासाठी मुख्यमंत्री होण्याची संधी मिळते.

सध्या गोव्यात ४९वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात एका सत्रात अनिल कपूर यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. ‘मास्टर क्लास विथ मि. इंडिया’ असे या सत्राचे नाव आहे. महत्त्वाची बाब अशी की, अनिल कपूर यांची ही मुलाखत खुद्द रिया कपूर हिनेच घेतली आहे. यावेळी बोलताना आपली एकदिवसीय पंतप्रधान होण्याची इच्छा व्यक्त केली. इतकेच नाही तर असे झाले तर भारतातील सर्व लोक आनंदी असतील.

महोत्सवातील मुलाखतीत बोलताना अनिल कपूर म्हणाले की, “३ इडियट्ससारख्या चित्रपटातून पालकांनी योग्य तो संदेश घ्यायला हवा. इतकंच नाही तर पालकांनी आपल्या मुलांना करिअरमध्ये हवं ते करू द्यावं. ज्या गोष्टीमध्ये मुलांना रस आहे त्यासाठी प्राधान्य देत पालकांनी त्यांनी सपोर्ट करावा. परंतु याबाबत मी जास्त भाषण देणार नाही कारण कारण मनोरंजन हेच माझं क्षेत्र आहे. आपल्याला ठाऊक असेल की, भूतानसारख्या देशात सर्वजण आनंदी आहेत.

मी नायक चित्रपटात एक दिवसाचा मुख्यमंत्री झालो. जर मला एक दिवसासाठी पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी एक दिवसाचा पंतप्रधानही होईन इतकेच नाही तर त्यानंतर भारतातील सर्व लोक आनंदी असतील हेच मी सर्वत्र पाहीन.” याशिवाय या मुलाखतीत अनिल कपूर यांनी सध्याचे चित्रपट, त्यांचे विषय यावरही भाष्य केल्याचं दिसून आलं. इतकेच नाही तर त्यांनी स्वत:च्या कारकिर्दीविषयीही मनमोकळेपणाने गप्पा मारल्याचं दिसून आलं.

Leave a comment

0.0/5