Skip to content Skip to footer

पुणे – ‘टोइंग’साठी अत्याधुनिक क्रेन

वाहतूक पोलिसांनी घेतली चाचणी : वाहने उचलताना नुकसान टळणार

पुणे – वाहने उचलण्यासाठी आणलेल्या नव्या तंत्रज्ञानयुक्‍त ‘टोइंग क्रेन’ची पोलिसांच्या वाहतूक शाखेने मंगळवारी चाचणी घेतली.

पुणे शहरातील वाहने उचलण्यासाठी वाहतूक शाखेस आवश्‍यकता होती. त्याबाबत शासनास प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार ही ‘क्रेन’ मागवण्यात आली आहे. ही ‘टोइंग क्रेन’ ही ‘हायड्रोलिक’ प्रकारातील असून दुचाकी वाहन उचलताना ‘हायड्रोलिक रॉड’ असल्याने वाहनाचे कोणतेही नुकसान होणार नाही. त्याचबरोबर यामध्ये उलचण्यात येणाऱ्या वाहनांचे व्हिडिओ ‘रेकॉर्डिंग’ करण्याची आणि सूचना देण्यासाठी ‘ऍम्प्लिफायर’ची व्यवस्था आहे.

वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत चालण्यासाठी, शहरातील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होणारी वाहने, बेवारस वाहने आणि ‘नो-पार्किंग’च्या ठिकाणी पार्क झालेली वाहने टेम्पोवरील कर्मचारी हाताने उचलून टेम्पोमध्ये ठेवत होते. त्यामुळे अधिक मनुष्यबळ लागत होते. त्याचबरोबर वाहनांचे नुकसान होण्यासह कर्मचाऱ्यांसह वादविवाद होत होते. नवीन प्राप्त होणाऱ्या ‘हायड्रोलिक टोइंग क्रेन’मुळे वाहन ‘टोइंग’ करणे सोईचे होणार आहे.

Leave a comment

0.0/5