Skip to content Skip to footer

मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्थ विधान केल्याबद्दल वाघोलीत नारायण राणेंचा पुतळा दहन करून जाहीर निषेध.

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त मुंबई व कोकण पट्ट्यामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीच्या पद्धत्तीने आक्षेपार्थ विधान करून मुख्यमंत्री यांच्याबाबत खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली आहे.त्यामुळे राणेंवर गुन्हा दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी.अशा मागणीचे निवेदन पत्र लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन पवार यांना देऊन शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी केली आहे.

आमचे मार्गदर्शक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्याबाबत अशाप्रकारची राणेंची भाषा अशोभनीय आहे.अशा बेताब वक्तव्यांमुळे राज्यातील नागरिकांच्या भावना व शिवसैनिकांच्या दुखावल्या जात असल्याचे शेवटी कटके यांनी सांगितले.

वाघोली(ता.हवेली) येथील पुणे-नगर महामार्गालगत केसनंद फाट्यावर मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्थ विधान केल्याबद्दल वाघोलीत जिल्हा शिवसेनेच्या वतीने नारायण राणेंचा पुतळा दहन करून राणेंच्या विरोधी शिवसेना अंगार हे,नारायण राणे भंगार हे !..कोंबडी चोर,कोंबडी चोर नारायण राणे कोंबडी चोर,नारायण राणे मुर्दाबाद.! आदी घोषणा देऊन जाहीर निषेध करण्यात आला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि.प.सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके,हवेली तालुका प्रमुख प्रशांत काळभोर,युवा सेना जिल्हाप्रमुख मच्छिंद्र सातव पाटील,वाहतूक सेना जिल्हाप्रमुख युवराज दळवी,जिल्हा संघटक रमेश भोसले,माजी तालुका प्रमुख अण्णासाहेब टूले,पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश सातव,उपतालुका प्रमुख रमेश भामगर,शिवसेनेचे जिल्हा समनव्यक विपुल शितोळे, शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख अर्चना भाडळे,शिवसेनेच्या तालुका समनव्यक अलका सोनवणे,शिवसेनेच्या माजी उपसरपंच कविता दळवी,वंदना घोलप,शरद माने,बबन कुंजीर,माजी सरपंच राजेंद्र भोरडे,वाघोली शहर प्रमुख दत्तात्रय बेंडावले,युवा सेना सरचिटणीस सुनील तांबे,युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश फडतरे,उपसरपंच रामदास ढगे,फुलगावचे माजी सरपंच सोमनाथ खुळे,माजी सरपंच शांताराम कोलते,राहुल काळभोर,राजेंद्र जोशी,स्वप्नील काळभोर,युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख गौरव काळभोर,युवा सेना तालुका प्रमुख विजय लोखंडे,पिंटू कटके,दत्तात्रय हरगुडे,तेजस राजवाडे,राजेंद्र जोशी,राहुल काळभोर,संतोष हगवणे,कृष्णा चौधरी,अमोल पवार,ऋषिकेश कटके,अविनाश उर्फ सोन्या तांबे,आदी शिवसैनिक उपस्थित होते.

वाघोली(ता.हवेली) येथील केसनंद फाट्यावर मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्थ विधान केल्याबद्दल वाघोलीत नारायण राणेंचा पुतळा दहन करून जाहीर निषेध करताना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके,सह जिल्ह्यातील शिवसैनिक.
आमचे राजकीय दैवत उद्धव ठाकरे साहेब हे महाराष्ट्रात आदर्शवत काम करीत आहेत.आणि असे काम करून सुद्धा त्यांच्या विरोधात नारायण राणे यांच्यासारख्या भाजप नेत्याने ठाकरे साहेबांबाबत चुकीचे अपशब्द वापरणे ही राणेंबाबत लज्जास्पद बाब आहे,राणेंचा आम्ही शिवसेना हवेली तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध करतो.

-प्रशांत काळभोर,शिवसेना तालुका प्रमुख,हवेली

 

राणेंच्या बेताल व्यक्तव्याचे आम्ही जिल्हा युवा सेनेकडून जाहीर निषेध करतो,राणेंवर त्वरित गुन्हा दाखल करून अटक करावी.अन्यथा आम्ही यानंतर अधिक तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू.
-मच्छिंद्र सातव पाटील,युवा सेना जिल्हाप्रमुख-पुणे.

शिवसेना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके आणि माऊली फाऊंडेशनच्या सहयोगाने वाघोलीमध्ये सुरु असलेल्या मोफत लसीकरण मोहिमेस प्रचंड प्रतिसाद

Leave a comment

0.0/5