बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; 67 हजारांचा गुटखा जप्त

बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक; 67 हजारांचा गुटखा जप्त |Illegal-gutkha-

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर गुटखा बाळगल्या प्रकरणी चिखली पोलिसांनी दोघांना अटक केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) पहाटे दीडच्या सुमारास जाधववाडी चिखली येथे घडली. अटक केलेल्या दोघांकडून 67 हजार 650 रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.

बाबुलाल गणाराम चौधरी, मुकेश गणाराम चौधरी (वय 24, दोघे रा. साईकुंज सोसायटी, जाधववाडी, चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी एस एस इंगळे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बाबुलाल आणि मुकेश यांनी त्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी करत केसरयुक्त विमल पान मसाला गुटखा 30 पुडे आणि केसरयुक्त विमल पान मसाला 10 बॅग्स असा एकूण 67 हजार 650 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. आरोपींवर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक घुगे तपास करीत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here