Skip to content Skip to footer

“पुणे तिथे काय उणे” बुलेट थाळी संपवा आणि नवीकोरी बुलेट घरी घेऊन जा !

“पुणे तिथे काय उणे” बुलेट थाळी संपवा आणि नवीकोरी बुलेट घरी घेऊन जा !

पुणे तसे विविध कारणासाठी चर्चेत असते मात्र आता एका आगळ्या-वेगळ्या जम्बो बुलेट थाळीमुळे पुन्हा चर्चेत आले आहे. आता पर्यंत आपण सरपंच थाळी, सावकार थाळी अशा विविध थाळ्यांची नावे ऐकली आहे. मात्र आता पुण्यात हॉटेल शिवराज यांनी नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर खवय्यांसाठी आणि बुलेट प्रेमींसाठी “बुलेट थाळी” घेऊन आले आहेत.

मुंबई-पुणे जुन्या हायवेलगत असणाऱ्या वडगाव जवळील ‘शिवराज’ हॉटेलने दिलेले आवाहन ऐकल्यानंतर सर्वांचे डोळे विस्फारतील हे नक्की. ‘बुलेट थाळी चॅलेंज’ असे या आवाहनाचे नाव आहे. या हॉटेलची महाकाय ‘बुलेट थाळी’ संपवा आणि त्याबदल्यात एक नवी कोरी रॉयल एन्फिल्ड बुलेट घेऊन जा, अशा प्रकारचं आवाहन देण्यात आले आहे.

पुणे-तिथे-काय-उणे-बुलेट-था-Pune-Tithe-Kay-Une-Bullet-Thaया हॉटेलच्या दारात प्रत्येकी १.७० लाख रुपयांच्या पाच नव्या कोऱ्या रॉयल एन्फिल्ड उभ्या असलेल्या दिसतात. शिवराज हॉटेलचे मालक अतुल वाईकर यांच्या डोक्यात ही कल्पना आली. लागोलाग त्यांनी याची अंमलबजावणी करत खाद्यप्रेमी आणि बुलेट प्रेमींना आवाहन दिले आहे

Leave a comment

0.0/5