कोरोनाच्या काळात प्लाजमा व रक्तदान ची टंचाई भासू नये म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य माऊली आबा कटके जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रामकृष्ण सातव भाजपा युवा मोर्चाचे हवेली अध्यक्ष अनिल सातव यांच्या मार्गदर्शनाखाली प्लाजमा व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते,
महाराष्ट्र कोरोनासारख्या महाभयंकर आजाराशी लढत असल्याने रक्ताचा तुटवडा भासत आहे. सोबतच प्लाजमा देखील उपलब्ध होत नाही. तर आपण देखील रक्तदान करुन कोणाचातरी जीव वाचवावा, असे आवाहन कटके यांनी केले आहे. त्यासाठी तुम्ही देखील पुढाकार घ्या आणि रक्तदान व प्लाजमा दान मोहिमेत सहभागी व्हा असेही, त्यांनी म्हटले आहे.
यापुढें देखील सातत्याने कोरोनाचा संकटकाळात अशी शिबिरे आयोजित केली जाणार आहेत असे आयोजन कर्त्यांनी सांगितले.
याप्रसंगी पूर्वरंग सोसायटी चेअरमन श्री राहूल खैरे कमिटी/सदस्य, शहर प्रमुख केतन जाधव, फुलमाळा रोडवरील सर्व सोसायटी कमिटी सदस्य यांचा संयुक्त विद्यमानाने व पुणे ब्लड सेंटर यांचा सहकार्याने आज फुलमाळा रोड याठिकाणी हे शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी फुलमाळा रोडवरील पूर्वरंग, ब्लेसिंग, मयुरी, साई गॅलॅक्सी, स्पंदन स्पर्श, व्हिनस पार्क, मॅनहॅटन, पार्कलेन प्रीमिअर, स्कायलाइट, पाल्म अटलांटिस, युनिक रेसिडेंसि या सर्व आयोजकांचा सहभाग व मदत झाली सर्व सोसायटीचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.