Skip to content Skip to footer

युवासेना कार्यकारिणीकडून दुष्काळग्रस्तांना ८७ हजार रुपयांची मदत

युवासेना कार्यकारिणीकडून दुष्काळग्रस्तांना ८७ हजार रुपयांची मदत

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्य्या वाढदिवसानिमित्त बॅनर, बुके इत्यादी खर्च टाळून तो पैसा समाजकार्यासाठी वापरण्याचं आवाहन शिवसेनेच्या वतीने करण्यात आलं होतं. या आवाहनास प्रतिसाद देत युवासेनेच्या कार्यकारिणीने ८७ हजार रुपयांचा धनादेश शिवसेना भवन येथे आदित्य ठाकरेंकडे सुपूर्द केला. ही रक्कम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना मदतनिधी म्हणून वापरण्यात येणार आहे.

या प्रसंगी शिवसेना सचिव श्री.सूरज चव्हाण, नगरसेवक श्री.अमेय घोले,कार्यकारिणी सदस्य श्री.प्रवीण पाटकर, युवासेना उपसचिव निलेश महाले, संदीप वरखडे,शार्दुल म्हाडगूत,सिद्धेश धाऊसकर,विस्तारक रणजीत कदम,सहसचिव जसप्रीत सिंग वडेरा, प्रथमेश वराडकर, अभय चव्हाण, विराज बनसोड उपस्थित होते.

बॅनरमुळे शहरांचे विद्रुपीकरण होत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा ऐकायला मिळतात. शिवाय बॅनर कोसळून अपघात झाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. वास्तविक अनधिकृत बॅनरबाजी कायद्याला धरून नाही. शिवसेनेने मात्र अनधिकृत बॅनरबाजी तर नकोच पण अधिकृत बॅनरसुद्धा लावू नयेत असं पत्रक काढत बॅनरबाजी न करण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते. शहर विद्रुपीकरण थांबवण्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल असून सर्वच पक्षांनी असा निर्णय घेतल्यास एक चांगली प्रथा सुरु होईल. युवासेना कार्यकारिणीने यासाठी पुढाकार घेत बॅनरसारख्या गोष्टीवर खर्च होणारा पैसा दुष्काळग्रस्तांना देत नवा पायंडा पाडला आहे.

 

वाढदिवस विशेष: दिग्गज नेत्यांनाही न जमलेल्या या गोष्टी आदित्य ठाकरे यांनी करून दाखवल्या, नक्की वाचा

Leave a comment

0.0/5