Skip to content Skip to footer

बाबूराव सणस पहिले महापौर यांचा पुतळा बसवायचा नसेल, तर परत द्या ! 

पुणे : शहराचे पहिले महापौर बाबूराव सणस यांचा पुतळा महापालिकेच्या प्रांगणात बसविण्याचा सत्ताधाऱ्यांना विसर पडल्यामुळे हा पुतळा परत मिळावा, अशी मागणी पहिल्या महापौरांचे पुत्र सुभाष सणस यांनी महापालिकेकडे केली आहे. तर सणस यांचा पुतळा लवकरच महापालिकेच्या प्रांगणात बसविण्यात येईल, अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी मंगळवारी दिली.

बाबूराव सणस हे पुण्याचे 1951-52 मध्ये महापौर होते. त्या वेळी स. गो. बर्वे महापालिका आयुक्त होते. सणस यांना 1954-55 मध्येही महापौर पदाची संधी मिळाली होती. महापालिकेच्या प्रांगणातील उद्यानात पहिले महापौर बाबूराव सणस यांचा पुतळा बसवावा, असा ठराव सर्वसाधारण सभेत 2007 मध्ये मंजूर झाला होता. त्या वेळी पुतळा प्रदान करण्याची इच्छा सणस यांचे सुपत्र सुभाष सणस यांनी दर्शविली.

त्यानुसार तीन लाख रुपये खर्च करून त्यांनी तो पुतळा तत्कालीन महापालिका आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या उपस्थितीत महापालिकेकडे सुपर्त केला. परंतु त्यानंतर पुतळा बसविण्यास महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना मुहूर्त मिळाला नाही. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या प्रांगणातील उद्यानाचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले, तेव्हा सणस यांच्या पुतळ्याबरोबरच महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांचाही पुतळा उभारण्याचे सर्वसाधारण सभेत ठरले.

त्याबाबतचा ठरावही मंजूर झाला. या दोन्ही पुतळ्यांसाठी चौथरे उभारण्यात आले. परंतु दोन्ही पुतळे बसविण्यासाठी प्रशासनाला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. त्यामुळे सणस यांनी महापालिका प्रशासनाला नुकतेच पत्र लिहून महापालिका पुतळा बसविणार नसल्यास तो परत मिळावा, अशी मागणी केली आहे.

https://maharashtrabulletin.com/ganpatidarshan-saurabh-mukhekar/

या बाबत सणस म्हणाले, ”बाबूराव सणस शहराचे दोन वेळा महापौर होते. पदरमोड करून त्यांनी शहरात विकासकामे मार्गी लावली होती. त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनेच घेतला आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात अडचण काय आहे? महापालिकेला पुतळा बसवायचा नसल्यास आम्हाला तो परत द्यावा. आम्ही तो ‘सणस प्लाझा’मध्ये बसवू. परंतु एकेकाळी शहराचे भूषण असलेल्या व्यक्तींबाबत अशी हेळसांड होऊ नये.” या बाबत नगरसवेक आबा बागूल म्हणाले, ”बाबूराव सणस आणि स. गो. बर्वे यांचा पुतळा उभारण्याचा सर्वसाधारण सभेचा ठराव आहे. त्याची प्रशासनाने तातडीने अंमलबजावणी करावी. महापालिकेच्या ऐतिहासिक वास्तूत पहिले महापौर आणि आयुक्त यांचे पुतळे नागरिकांना माहिती होण्यासाठी आवश्‍यक आहेत.”

दोन्ही पुतळे लवकर बसविणार : टिळक 
या बाबत महापौर मुक्ता टिळक म्हणाल्या, ”सणस कुटुंबीयांनी महापालिकेला दहा वर्षांपूर्वी बाबूराव सणस यांचा पुतळा दिला आहे. परंतु इतक्‍या कालावधीत हा पुतळा का बसला नाही, या खोलात आता जाणार नाही. सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या ठरावांचा आढावा घेऊन सणस आणि स. गो. बर्वे यांचे पुतळे लवकरात लवकर महापालिकेच्या प्रांगणातील उद्यानात बसविले जातील.”

अधिक माहितीसाठी

Leave a comment

0.0/5