Skip to content Skip to footer

जिथे घाणीचं साम्राज्य होतं तिथे आदित्य ठाकरेंमुळे साकारणार सुंदर उद्यान

नगर येथील आदित्य संवाद कार्यक्रमात एक विद्यार्थिनी उभी राहते. महाविद्यालयाजवळ शहरातील कचरा आणि हॉटेलमधले मासाचे तुकडे आणून टाकले जातात. विद्यार्थिनींना त्याचा त्रास होतो. एवढंच नाही तर मासाच्या तुकड्यांमुळे हिंस्त्र कुत्र्यांचा त्रास वसतिगृहातील मुलींना होतो अशी समस्या मांडते.

समस्या ऐकणारे आदित्य ठाकरे आश्वासन देऊन पुढे न जाता केवळ १० मिनिटात तात्काळ महाविद्यालयात दाखल होतात. परिसराची पाहणी करून कार्यवाहीचे आदेश दिले जातात. केवळ २० मिनिटात जेसीबी वाहन परिसरात दाखल होते. परिसराच्या स्वच्छतेला सुरुवात होते.

एवढंच नव्हे तर तिथे झाडांची लागवड करून परिसरात बसण्यासाठी बाकडे बसवण्याच्या प्लॅन बनतो. जिथे एकेकाळी घाणीचं आणि दुर्गंधीच साम्राज्य होतं त्याच जागी सुंदर उद्यान साकारू लागतं. ही काही एखाद्या हिंदी चित्रपटाची स्टोरी नाही. हे स्वप्नंही नाही. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी हे प्रत्यक्षात करून दाखवलं आहे.

सदर जागेवर उभं राहणार सुंदर उद्यान

याबाबत सविस्तर माहिती अशी की नगरमधील राधाबाई काळे महाविद्यालयाच्या परिसरात नाला आहे. त्यातच परिसरात शहरातील कचरा आणि हॉटेलमधील मासाचे तुकडे आणून टाकले जात असत. यामुळे परिसरात घाणीचं आणि दुर्गंधीचं साम्राज्य होतं. हा प्रश्न महाविद्यालयाच्या विद्यार्थीनेने मांडला आणि आदित्य ठाकरेंनी वेळ न दवडता चक्रं फिरवली. २० मिनिटात परिसराची स्वच्छता सुरू झाली. पण हा फक्त ट्रेलर ठरला. सदर जागेवर झाडांची लागवड करून सुंदर उद्यान उभं करण्यात येईल. तसेच बसण्यासाठी बाकड्यांची सोय सुद्धा केली जाईल. परिसराचं सुशोभीकरण करण्यात येईल अशी माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली आहे. संबंधित प्रकल्पाचा आराखडा बनवण्याचे आदेश सुद्धा त्यांनी दिले. यावर लवकरात लवकर काम सुरु होईल असं समजतं.

आदित्य ठाकरे हाच चर्चेत

सदर परिसरात उद्यान उभं राहणार असल्याचं समजताच विद्यार्थिनींच्या आनंदाला पारावार उरला नाही. केवळ घाणीची समस्या दूर करण्यास सांगितली असतानाही त्याठिकाणी सुंदर उद्यान उभं करण्यात येणार असल्याने विद्यार्थिनींनी आदित्य ठाकरेंचे आभार मानले. सादर परिसरात आदित्य ठाकरे हाच विषय गेल्या तीन दिवसांपासून चर्चेत आहे. दौऱ्यावर अनेक नेते येतात. त्यांच्यासमोर प्रश्न मांडले जातात. नेतेही निवेदन स्वीकारून पुढे जातात. मात्र आदित्य ठाकरेंनी प्रश्न ऐकताच केवळ १० मिनिटात परिसराची पाहणी केली आणि परिसर स्वच्छता सुरु झाली. अपेक्षा एवढीच होती, त्यामुळे तिथे आता उद्यान उभं राहणार हा बोनसचं. त्यामुळे “आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो दोन” असं म्हणत महाविद्यालयातील विद्यार्थिनी आणि परिसरातील नागरिक आदित्य ठाकरेंप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहेत.

आदित्य ठाकरेंकडून १ लाख २५ हजार वह्यांचे वाटप

5 Comments

Leave a comment

0.0/5