Skip to content Skip to footer

ठाकरे सरकारचा निर्णय वाड्या -वस्त्यातील जातीवाचक नावे होणार हद्दपार

ठाकरे सरकारचा निर्णय वाड्या -वस्त्यातील जातीवाचक नावे होणार हद्दपार

                     राज्यातील अनेक खेड्यांना पूर्वी पासून जातीवाचक नावे ठेवण्यात आलेली आहे. आणि त्याच नावाने त्या वाड्या खेडेगावात ओळखल्या जातात. आता ठाकरे सरकार वाड्यावस्त्यांना देण्यात येणाऱ्या जातीवाचक नावे बदलणार आहे. याबाबत लवकरच मंत्री मंडळात निर्णय होणार आहे. 

                     मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत याबाबत प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. सामाजिक न्याय विभाग याबाबतचा प्रस्ताव देईल. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबतचे काही दिवसांपूर्वी संकेत दिले होते. त्यामुळे आता वाड्या वस्त्यांना असणारी जातीवाचक नावे हद्दपार होऊ शकतात.

                    महाराष्ट्रात कुठेही जातीच्या नावाने वस्ती असायला नको, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना दिल्या होत्या. वाड्या-वस्त्यांना शाहूनगर, समतानगर, ज्योतीनगर, प्रगतीनगर, विकासनगर अशी नावे ठेवण्याचा विचार आहे.

                वंचित घटकाला न्याय देण्यासाठी काही बदल करणे गरजेचं आहे. यामुळे काहींची मनं दुखावली जातील, पण हे बदल करणे आवश्यक आहे, असे मंत्री धनंजय मुंडे म्हणाले आहेत. या निर्णयामुळे अनेक वर्ष एका विशिष्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या वस्त्यांची नावे बदलली जाणार आहे.

Leave a comment

0.0/5