Skip to content Skip to footer

शिवसेना उत्तरप्रदेश पंचायत निवडणूक लढवणार ?

शिवसेना उत्तरप्रदेश पंचायत निवडणूक लढवणार ?

बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींमध्ये शिवसेना पक्षाने काही जागा लढवल्या होत्या. मात्र शिवसेना पक्षाच्या हाती अपयश लागले होते. मात्र शिवसेनेने भाजपा बरोबर इतर विरोधी पक्षांना घाम फोडला होता. त्यात आता उत्तरप्रदेशमध्ये होणाऱ्या पंचातीच्या निवडणुकीमध्ये पुनः एकदा शिवसेना आपले नशीब आजमावणार आहे.

यावर उत्तर प्रदेश शिवसेना प्रमुख अनिल सिंह म्हणाले की, पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार आढावा घेऊन पक्षाच्या वतीने प्रभारी नियुक्त केला जात आहे. सर्व जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देणार आहे.

निवडणूक व्यवस्थापनाची माहिती जाणून घेण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात पाठविण्यात येणार आहे. हे लोक सुमारे एक आठवडा मुक्काम करतील. शिवसेना बीएमसी व ग्रामीण भागात कशी कार्यरत आहे, हे शिकवण्यात येणार आहे. तेथून परत आल्यानंतर पूर्वांचल, पश्चिम बंडल विभागात प्रशिक्षण होईल. यानंतर उमेदवारांची निवड करुन त्यांना मैदानात उतरवले जातील अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a comment

0.0/5