Skip to content Skip to footer

धक्कादायक – जलीकट्टू च्या विजेत्याला बैलाची मालकीण मिळणार बक्षीस

देशभरात नुकताच विविध नावानी संक्रांतीचा सण अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. दक्षिण भारतात पोंगल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सणाच्या निमित्ताने जलीकट्टू या खेळाचाही थरारही नुकताच तामिळनाडूमध्ये पाहायला मिळाला. या खेळाबाबत अनेक प्रथा, परंपरा असल्याचे आपण कायमच ऐकतो. शेकडो वर्षांपासून दाक्षिणात्य संस्कृतीत अतिशय आवडीने हा खेळ खेळलाही जातो. उधळलेल्या वळूवर ताबा मिळविणाला अनेक आकर्षक बक्षीसे दिली जातात.

मागील काही दिवसांपासून जलिकट्टू हा खेळ विविध कारणांनी चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा त्याबाबतच्या चर्चेला उधाण आले असून त्याचे कारणही तसेच आहे. या खेळात वळूला ताब्यात आणल्यामुळे बक्षीस मिळणे इथवर ठिक आहे.

https://maharashtrabulletin.com/california-acident-car/

पण या स्पर्धेत जिंकणाऱ्या व्यक्तींना एक अजब बक्षीस देण्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. हा प्रकार ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. या खेळात जिंकलेल्या एकाला बक्षीस म्हणून वळूची मालकीण देण्यात येणार आहे.

‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २१ वर्षांची मुलगी आपल्या वळूला घेऊन आली होती. यावेळी आयोजकांनी अचानक जो व्यक्ती या वळूला पकडू शकेल त्याला वळूसोबत त्याची मालकीणही मिळेल अशी घोषणा केली.

आता जाहीर झालेला हा जलीकट्टू वळू कोणी आपल्या ताब्यात घेतला याबाबतची माहिती मिळू शकलेली नसून हे अजब प्रकारचे बक्षिस कोणाला मिळाले सांगता येणार नाही.

Leave a comment

0.0/5