Skip to content Skip to footer

यापुढे इंधन बचत चाचणीत पास झाले तरच ड्रायव्हींग लायसन्स

ट्रक, बसेस हे जड वाहन चालविण्याचे ड्रायव्हींग लायसन्स देताना यापुढे इंधन बचत क्षमता चाचणी होणार असून या चाचणीत जो इंधन (डिझेल) वाचवेल त्यालाच हेव्ही लायसन्स देण्यात यावे, असे आदेश केंद्र शासनाने काढले असून त्यांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देशातील सर्व आरटीओंना दिले आहे.

बुलढाण्याच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी सुद्धा सदर आदेश प्राप्त झाले आहे. याबाबत त्यांनी सुद्धा पत्रक काढून या आदेशाची माहिती देणे सुरु केले आहे. सध्या संपूर्ण देशभर पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ चांगलीच गाजते आहे. अशा पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने मोटार वाहन नियम १९८९ मध्ये सुधारणा केली आहे. जड माल वाहतूक व जड प्रवाशी वाहतूक लायसन्स देण्यासाठी इंधन बचत चाचणी ५ कि.मी. अंतरावर वाहन चालवून घेण्यात येईल. या चाचणीत जो इंधन वाचवेल तोच पास होईल व त्याला हेव्ही लायसन्स देण्याचे व पुढील कार्यवाही करण्याचे फर्मान २२ ऑक्टोबर रोजी केंद्र शासनाने काढले असून संपूर्ण देशभरातील आरटीओंना कार्यवाहीसाठी पारीत केले आहे. त्यामुळे यापुढे हेव्ही लायसन काढणार्‍यांमध्ये एकच खळबळ माजली आहे.

Leave a comment

0.0/5