Skip to content Skip to footer

अजून एका ऑनलाईन गेम ने घेतला अल्पवयीन विद्यार्थ्याचा बळी

जयपूरब्लू व्हेल, किकी, आणि मोमो या ऑनलाईन गेमनंतर अजून एक नवीन ऑनलाईन गेम तरुणांसाठी कर्दनकाळ बनून अवतरलाय. मारवल असे या ऑनलाईन गेमच नाव असून या गेमच्या नादापायी राजस्थानमध्ये शनिवारी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली आहे. विपिन शर्मा असे त्याचे नाव असून तो अकरावीत शिकत होता.

मूळचा हरयाणातील महेंद्रगड येथे राहणारा विपिन आबूरोड येथे मामेभावाकडे राहत होता. अभ्यासातही तो हुशार होता. पण त्याला ऑनलाईन गेमच व्यसन जडले होते. गेल्या काही दिवसांपासून तो घरात कोणाबरोबरही बोलत नव्हता. सतत गेम खेळायचा. शनिवारी दुपार उजाडली तरी तो बेडरुममधून बाहेर आला नाही. यामुळे बहिणीने बेडरुमचा दरवाजा ठोठावला. पण आतून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने तिने घरातल्यांना बोलावले. त्यानंतर दरवाजा तोडला असता आतील दृश्य पाहून घरच्यांच्या पायाखालची जमिनच सरकली. पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत विपिनचा मृतदेह लटकत होता.

यावेळी आत्महत्येपूर्वी त्याने भिंतीवर चिटकवलेली एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. त्यात ‘आय क्विट’ असे लिहले होते. तसेच बेडरुममध्ये मारवल गेमबद्दल विपिनने लिहलेली एक वहीदेखील पोलिसांना सापडली. त्यात मारवल गेमच्या सगळ्या स्टेप्सबद्दल लिहण्यात आले होते.

त्यावरून विपिनने मारवल गेमच्या नादात आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले.

Leave a comment

0.0/5