Skip to content Skip to footer

लॉकडाऊन दरम्यान तब्बल ६० लाख लोकांनी गमावला रोजगार

लॉकडाऊन दरम्यान तब्बल ६० लाख लोकांनी गमावला रोजगार

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठाव्ढ्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. याकाळात अनेक उद्योगधंदे कोरोनाच्या संसर्गामुळे बंद स्थितीत असल्यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागलाय आहेत.

या लॉकडाऊनच्या काळात ‘व्हाईट कॉलर’ पेशा समजल्या जाणाऱ्या लाखो नोकरदारांना याचा जोडणे फटका बसला आहे. ‘इंजिनीअर, फिजिशियन, अकाउंटंट, विश्लेषक आणि शिक्षकांसारख्या’ अनेक प्रकारच्या नोकरदारांना आपली नोकरी गमवावी लागली असून हे कर्मचारी आता बेरोजगार झाले आहेत.

सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी अर्थात सीएमआयई या संस्थेने एक अहवाल जारी केला असून त्यात हा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. सरकारने जूनमध्येच अनलॉकची प्रक्रिया सुरु केली असली तरी, सातत्याचे निर्बंध आणि स्थानिक पातळीवरील लॉकडाऊन यामुळे अर्थव्यस्था सुधारण्यात अडथळे येत आहेत.

Leave a comment

0.0/5