Skip to content Skip to footer

कृषी विधेयकावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच भाजपा खासदाराने काढला पळ.

कृषी विधेयकावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच भाजपा खासदाराने काढला पळ.

केंद्र सरकाने तयार केलेल्या कृषी विधेयकाविरोधात सर्वत्र भाजपा विरोधात संतापाची लाट पसरली आहे. तर अनेक ठिकाणी असंतोषाचे वातावरण निर्माण होऊन हिंसक आंदोलनाला सुरूवात झालेली आहे. त्यातच या विधेयकाला राष्ट्रपतींनी स्वाक्षरी करून कृषी विधेयकाला अंतिम रूप दिले आहे.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठी हा काळा दिवस असल्याची संतप्त प्रतिक्रिया भाजपाची साथ सोडलेल्या शिरोमणी अकाली दलाने दिली आहे. त्यात या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून, नवी दिल्ली येथे इंडिया गेटजवळ ट्रॅक्टर पेटवून दिली असल्याची घटना आता समोर येत आहे.

मात्र मागील काही दिवसांपासून देशभरामध्ये या विधेयकांविरोधात आंदोलने सुरु असली तरी पंजाब आणि हरियाणामध्ये या आंदोलनांची तिव्रता अधिक मोठया प्रमाणात जाणवत आहे. याच आंदोलनादरम्यान शनिवारी हरियाणाचे इंद्री येथील भाजपाचे खासदार राम कुमार कश्यप यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

सोशल मिडियावर त्यांचा यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांनी भाजपा खासदाराला घेरल्याचे दिसत असून, ते या कृषी विधेयकाबद्दलचे प्रश्न खासदाराला विचारताना दिसत आहे. मात्र शेतकऱ्यांनी प्रश्नांचा मारा केल्यानंतर भाजपा खासदार कश्यप यांनी तिथून पळ काढला आहे. यावेळी खासदार शेतकऱ्यांची समजूत काढत होता मात्र शेतकऱ्यांनी सरकार विरोधात घोषणा देण्याचे चालू करताच खासदार राम कुमार कश्यप यांनी तेथून पळ काढला.

Leave a comment

0.0/5