Skip to content Skip to footer

बड्या भाजपा नेत्याच्या चालू सभेत शेतकऱ्याचा मृत्यू, तरीही भाषणे सुरु ठेवल्यामुळे काँग्रेसने घेरले..


बड्या भाजपा नेत्याच्या चालू सभेत शेतकऱ्याचा मृत्यू, तरीही भाषणे सुरु ठेवल्यामुळे काँग्रेसने घेरले..

बिहारमध्ये विधानसभा निवडणूक असली तरी मध्यप्रदेशात सुद्धा पोट निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशातील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. जोतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला होता. त्यामुळे मध्यप्रदेशात सत्तापालट झाली होती. शिंदे यांच्या प्रचार सभेच्या वेळी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता तरीही भाजपा नेत्यांनी आणि त्यानंतर जोतिरादित्य सिंधिया यांनी आपले भाषण सुरुच ठेवले होते.

खांडवा जिल्ह्यातील मंधाता विधानसभा मतदार संघातील भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत ही घटना घडलेली आहे. शिंदे येण्यापूर्वी स्थानिक नेत्यांची भाषणं सुरु होती. दरम्यान पांढावा येथील भाजपा आमदार राम डांगोरे यांचे भाषण सुरु असताना ८० वर्षाच्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.

शेतकऱ्याचा मृत्यू होताच आजूबाजूला बसलेल्या लोकांमध्ये गोंधळ उडाला. तरीही नेत्यांची भाषणं थांबली नाही. काही वेळातच तेथे खासदार जोतिरादित्य सिंधिया पोहचले होते. मात्र त्यांनी सुद्धा आपले भाषण सुरूच ठेवले हाच मुद्धा पकडून काँग्रेस पक्षाने सिंधिया आणि उपस्थित नेत्यावर जोरदार टीका केली होती.

Leave a comment

0.0/5